आयुर्वेदानुसार निरोगी आरोग्याची पंचसूत्री

       आयुर्वेद जगातील सर्वात प्राचीन भारतीय वैद्यकीय शास्त्र आहे. आयुर्वेद हे नाव सर्वांमध्ये प्रचलित आहे पण आयुर्वेद बद्दल भारतीय लोकांमध्ये अज्ञान आहे , अहो भारतीय आपलं स्वतःच शास्त्र असून सुद्धा त्याचा बद्दल आपल्याला सखोल ज्ञान नाही किंवा जे काही थोडं असावं ते सुद्धा चुकीचं असत. का चुकीच असतं तर आपण ते ज्ञान तज्ञ व्यक्तीकडून आत्मसाद केलं नसत तर ते 4 लोकांना कडून ऐकलं असत , आपल्या देशात मोफतचा चुकीचा सल्ला देणाऱ्यां कमी बिलकुल नाही ते आपल्याला आजू बाजूला चौकाचौकात दररोज भेटतात आणि आपण त्याच बोलणं एकदम मन लावून ऐकतो आणि घरी जाऊन उत्साहाने तो सल्ला पाळणे चालू करतो परिणामी त्याचा फायदा होत नाही तर नुकसान होत त्यामुळे जनसमुदायमध्ये आयुर्वेदाची प्रतिमा खराब होते स्वकर्मा मुळेच, तर कृपया अस काही करू नका तज्ञ व्यक्ती कडून आयुर्वेद सल्ला आपल्याला पर्येंत पोहोचावा यासाठी मी हा लेख लिहीत आहे. जगाच्या पाठीवर प्रचंड पैसे कमावणारे लोक आपल्याला भरपूर भेटतील पण आरोग्य कमावणारे आपल्याला भेटणारे तसे दुर्मिळच. तर आयुर्वेदद्वारे आपण जाणून घेऊ या आरोग्य कसे कमवावे. 

        आयुर्वेद शास्त्राचे उद्दिष्ट आहे की निरोगी व्यक्तीच्या आरोग्यचे रक्षण करणे आणि रुग्णाला आजारमुक्त (व्याधीमुक्त) करणे. आयुर्वेदच्या तत्वानुसार “अग्नि” नावाची संकल्पना आहे. आयुर्वेद सांगत की “सर्व आजाराचे मूळ हे मंद अग्नि” म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा होतो की आपलं आरोग्य हे अग्निवर अवलंबून आहे, जर आपल्याला आरोग्य जपायचं किंवा कमवायच असेल तर आपण आपल्या अग्नीच प्रयत्न पूर्वक रक्षण केले पाहिजे.” आपण जे दररोज आहार सेवन करतो त्याच पचन योग्य प्रकारे करून त्या आहाराचे योग्य परिणमन करून संपूर्ण शरीर, इंद्रियें आणि मन याना पोषण द्यायचे काम अग्नि मार्फत होत असते आणि जेव्हा अग्नि मंद होतो तेव्हा आपल्याला आजार होतात आणि अग्नि नष्ट झाला आपला अंत होतो अस चरक संहिता मध्ये लिहिलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 9 देशामध्ये आयुर्वेद प्रचार आणि प्रसार करताना 5 महत्वाचे गोष्टी माझ्या निरीक्षणात आल्या त्या जर आपण सांभाळल्या तर आपलं आरोग्य आपल्या खिश्यात राहू शकते.

1) व्यायाम – नित्य सकाळी लवकर व्यायाम करणे आरोग्यास अत्यंत उपयोगी आणि महत्वाचे आहे. का हो अस ?
आयुर्वेदमध्ये अष्टांग हृदय नावाचा महत्वाच्या ग्रंथ मधील हा संदर्भ
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोऽग्निर्मेदसः क्षयः।
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते॥१०॥
व्यायाम केला की शारीर हलके वाटते, उत्साह वाढतो , कार्य कार्य करण्याची क्षमता वाढते, दीप्त अग्नि म्हणजे व्यायाम केल्याने आपला भुकेचा अग्नि एवढा सक्षम होतो की दिवस भरात आपण जो काही आहार सेवन करू तो योग्य पचवून त्याच उत्तम पोषक आहार रसात रूपांतर करुन शरीराचे आणि मनाचे पोषण करतो त्याच बरोबर शारीरिक सुदृढता सुद्धा व्यायामाने मिळते.

SAVE_20200117_131031.jpg

पण व्यायाम कसा असावा ?
दररोज 30 तर 40 मिनिटे फास्ट वाकिंग हा उत्तम व्यायाम. व्यायाम हा वातानुकूलित जागेत करू नये. आणि स्त्रियांनी किंवा तरुण मुलींनी मासिक पाळीमध्ये व्यायाम करू नये.

2) अत्यम्बुपान – जास्त मात्रेत जल सेवन करणे हे भुकेचा अग्नी मंद करण्याचे प्रमुख कारण आहे. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर 1 ते 3 ग्लास पाणी प्यायची सवय असते. त्याचा समज अस आहे मी सकाळी उठून भरपूर पाणी प्यायलो की पोट साफ होत आणि शारीरिक शुद्धी होते. आपलं गैरसमज मला मला दूर करावासा वाटतो की सकाळी उठून तहान नसताना भरपूर प्रमाणात जल सेवन केलं तर ते अग्नी मंद करायचे प्रमुख कारण आहे. जर जल सेवन करायचे असल्यास तहान लागल्यास करावे व ते कोमट किंवा उष्ण असावे आणि सकाळी जल सेवन करायचे असल्यास ते सूर्य उदया पूर्वी करावे जर तहान लागल्यास.

SAVE_20200117_131858.jpg

किती लिटर पाणी दिवस सेवन करावे ?

कोणी किती लिटर पाणी प्यावे हे अंकात न सांगता जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा कोमट किंवा गरम जल सेवन करावे. प्रत्येकाचे शरीर आणि प्रत्येकाच्या गरजा या एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत.
उदाहरणार्थ – जेवढे पाणी एका एका खेळाडू ला दिवसभरात गरजेचे आहे तेवढेच पाणी एका वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणाऱ्याला कर्मचाऱ्याला लागणार नाही त्याचा शरीराची गरज वेगळी आहे. त्यामुळे सध्या समाजात जो सरसकट सर्वाना ४ ते ६ लिटर पाणी सेवन करा असा एकच सल्ला दिला जातो तो चुकीचा आहे कारण त्या अधिक पाण्याच्या सेवनाने शरीरातील पचनसंस्थेचा अग्निमंद होते आणि हे सातत्याने झाले तर त्यापासून अजीर्ण , अम्लपित्तसारखे पचन संस्थेचे आजार उद्भवतात.  फ्रीज मधील जलाचे सेवन शक्यतो टाळावे. भोजन सेवन करत असताना नेहमी जलसेवन कोमट किंवा उष्ण जेवणामध्ये थोडे थोडे करावे जे अमृत समान कार्य करते,भोजन पूर्वी जलाचे सेवन अजीर्ण करते, आणि भोजननंतर जल सेवन विष समान कार्य करते म्हणून नेहमी भोजनमध्ये थोडे थोडे जल सेवन करावे.

3) अध्यशन – अध्यशन हा संस्कृत शब्द आयुर्वेद ग्रंथात बऱ्याच ठिकाणी वारंवार आला आहे त्याच अर्थ असा आहे की पूर्वीच्या अन्नाचे योग्य पचन होण्याआधीच पुढच्या अन्नाचे सेवन करणे. हे कारण ज्यास्त प्रमाणात जगात आढळले जाते, कारण आयुर्वेद सांगतो की जेव्हा भूक लागेल तेव्हाच अन्नाचे सेवन करा, पण आपण वेळ झाली म्हणून आता जेवण केलं पाहिजे या विचाराने भोजन करतो पण जेव्हा भूक लागली नसते तेव्हा भोजन करू नये कारण भूक लागणे हे आधीचे अन्न पचण्याचे लक्षण आहे आणि ते जो पर्येंत जाणवत नाही तो पर्येंत भोजन करू नये जर तसे सातत्याने केलं तर अग्निमंद होतो आणि व्यक्ती रुग्ण बनतो म्हणून आपल्या भुकेच्या अग्निकडे लक्ष जरूर द्या आणि अध्यशन टाळा.

SAVE_20200117_132103.jpg

4) विषमाशन –
गरजेपेक्षा अति किंवा कमी किंवा अयोग्यवेळी भोजन सातत्याने करणे म्हणजे विषमाशन.
जे नोकरी करणारे मंडळी आहेत त्यामध्ये हे कारण सातत्याने आढळते कारण त्यांना जेवायची एक फिक्स वेळ दिली जाते त्यात त्यानं जेवण करावं लागत त्यावेळी त्यांना भूक असली किंवा नसली तरी , त्याचप्रमाणे लोकांना भोजन करतात दूरदर्शन पाहता किंवा मोबाईल हाताळता जेवायची सवय असते त्यामुळे न कळत का होईना पण कमी किंवा ज्यास्त जेवतो. काम करत असताना भूक लागते पण कामात मग्न असल्यामुळे आपण जेवण करत नाही पण जेव्हा नंतर जेवायला बसतो तेव्हा भुकेचा अग्नी मंद झाला असतो पण जेवन मात्र आपण त्यात मात्रेत करतो. या सर्व कारणांमुळे आपण विषमाशन आवर्जून टाळावे .

Fruit-Custard-480x270

5) विरुद्ध आहार –
विरुद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेद शास्त्रात लिहिली आहे . जे अन्न शरीरातील दोष, धातू, मल याना दुष्ट करते किंवा विकृत करते ते म्हणजे विरुद्ध आहार .
उदाहरण –
दुधाचा चहा किंवा बिस्किटे किंवा चपाती एकत्र करून खाणे हे आपल्याकडे सर्वात जास्त प्रमाणात घेतला जाणार विरुद्ध आहार आहे. फक्त 15 दिवस चहा बंद करून पहा काय फरक पडतोय तुमच्या प्रकृती मध्ये .
2) फळ आणि दूध एकत्र करून सातत्याने सेवन करणे.
3) वजन कमी करण्याच्या उद्देशाने दररोज सकाळी गरम पाणी + मध सेवन करणे .
4) भात शिजवताना त्यात मीठ टाकणे.
अजून बरेच उदाहरण आहेत पण ही उदाहरण सातत्याने सेवन केली जाणारी आहेत. ती जर आपण करत असू तर त्याचे सेवन करू नये .

या वरील 5 गोष्टी कडे जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात लक्ष दिलं तर आपलं आरोग्य नक्कीच उत्तम राहील पण जे लोक आमच्याकडे वेळ नाही असे स्वतःची समजूत काढून लक्ष देत नाहीत तेच लोक पुढे जाऊन इमर्जनसी परिस्थितीला समोरो जातात आणि त्यावेळी त्यांना आई.सी.यु मध्ये झोपायला वेळ काढावा लागेतोच त्यामुळे योग्य वेळीच जागे व्हा आयुर्वेदाची कास धारा आणि आरोग्य कमवा , पैसातर आयुषभर कमवायचा तर आहेच,फक्त पैसेच्यामागे आरोग्याला विसुर नका.”

टीप – वाचकांना विनंती आहे की आयुर्वेद लोकांपर्येंत पोहोचवण्यासाठी या ब्लॉगची लिंक ज्यास्तीतज्यास्त लोकांबरोबर शेअर करा.

  • डॉ. गौरव दवे (आयुर्वेदाचार्य)
    आंतरराष्ट्रीय आयुर्वेद फीजीशीयन
    डिरेक्टर – डॉ. दवे आयुर्वेद पंचकर्म वेलनेस क्लिनिक.
    पनवेल , महाराष्ट्र.
    कॅन्सलटिंगसाठी – 8898888525 (पूर्वनियोजित वेळेनुसार)